'कोव्हीड १९' लॉक डाउन मधून बाहेर पडण्यासाठी!
वाहनांच्या अपघातांची आणि इतर आजारांमुळे होणारे मृत्यू यांची "कोव्हीड-१९" बरोबर तुलना करायची झाली तर ते मृत्यू अपघाताने येत आहेत सहभागाने नाहीत. अपघात आणि सहभाग यात खूप तफावत आहे. त्या मुळे "करोना बरोबर जगणे" हे प्रत्येकाला कितपत शक्य आहे हा एक प्रश्न आहे. जीव मुठीत घेऊन आपण काय काय कामे करू शकणार आहोत? घरातल्या कर्त्या माणसांना दिवसभर बाहेर कमला गेल्या नंतर कुटुंबातील इतर व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे? शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य किती सुरक्षित असणार आहे? 'कोव्हीड १९' लॉक डाउन मधून बाहेर पडण्या साठी आपल्या कडे पर्याय उपलब्ध आहे! अशा परिस्थितीतीत भारताशी अनुकूल अशी उपाय योजना होणे गरजेचे आहे. डब्लू. एच. ओ. चे नियम इथे परिणामकारक असणार नाहीत. उदा. रस्त्यात थुंकणे ही सवय मोडण्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाही. शिक्षण, शिस्तीचा आभाव, लोकसंख्या व गरिबी या गोष्टीं मुळे दोन व्यक्तीतील अंतर नियंत्रित ठेवणे अशक्य आहे. अशा वेळी सद्य परिस्थितीत शहरातील विलगीत क्षेत्रात विषाणूचा प्रादुर्भाव कमी करणे अशक्य आहे. या विषाणूच्या प्रसाराचा सर्वात महत्वाचा आणि दुर्लक...