Posts

Showing posts from June, 2020

१००% भारतीय द्विचक्री!

१००% भारतीय द्विचक्री!  सायकल हा शब्दच मुळात इंग्रजी आहे, याला पर्यायी मराठी किंव्हा संस्कृत शब्द नाही असे म्हणतात पण मी शोधून काढला. माझा स्वत:चा द्विचक्री विक्री, विपणन, सुटे भाग व संसाधन यांचा व्यवसाय आहे. सध्या ग्राहकांची स्वदेशी द्विचक्री ची मागणी वाढत आहे पण दुर्दैवाने एकही अधुनिक द्विचक्री भारतात तयार होत नाही कुठल्या न कुठल्या सुट्ट्या भागा करता इतर देशांवर निर्भर रहावे लागते. खास करून चीन मधे तयार होणार्या द्विचक्री विकताना तळपायची आग मस्तकात जाते पण कुणी तरी द्विचक्री चालवायला उद्युक्त झाले आहे हे काय कमी  निदान आपल्या देशातील प्रदुषण कमी होईल हा एक दिलासा मिळतो.  खूप वर्षांपासून १००% भारतीय बनावटीची रुपे या धातूचे मिश्रण असलेल्या सांगाड्यचा वापरून करून भारतातील गरजां साठी रेखीत अशी द्विचक्री बनवण्याचा मनसुबा आहे. रूप्याचा सांगाडा बनवायचा असेल तर एक विशिष्ट प्रक्रीया आहे त्यासाठी वेगळीच यंत्र  सामग्री लागते. सुरवातीला मला देखील त्यात काय अवघड आहे असे वाटले म्हणून मी एका अनुभवी व प्रथितयश उद्योगपतींना या विषया संदर्भात भेटलो. त्यांना विचारले, "सर आपण चंद्रया...