१००% भारतीय द्विचक्री!

१००% भारतीय द्विचक्री! 
सायकल हा शब्दच मुळात इंग्रजी आहे, याला पर्यायी मराठी किंव्हा संस्कृत शब्द नाही असे म्हणतात पण मी शोधून काढला. माझा स्वत:चा द्विचक्री विक्री, विपणन, सुटे भाग व संसाधन यांचा व्यवसाय आहे. सध्या ग्राहकांची स्वदेशी द्विचक्री ची मागणी वाढत आहे पण दुर्दैवाने एकही अधुनिक द्विचक्री भारतात तयार होत नाही कुठल्या न कुठल्या सुट्ट्या भागा करता इतर देशांवर निर्भर रहावे लागते. खास करून चीन मधे तयार होणार्या द्विचक्री विकताना तळपायची आग मस्तकात जाते पण कुणी तरी द्विचक्री चालवायला उद्युक्त झाले आहे हे काय कमी  निदान आपल्या देशातील प्रदुषण कमी होईल हा एक दिलासा मिळतो. 

खूप वर्षांपासून १००% भारतीय बनावटीची रुपे या धातूचे मिश्रण असलेल्या सांगाड्यचा वापरून करून भारतातील गरजां साठी रेखीत अशी द्विचक्री बनवण्याचा मनसुबा आहे. रूप्याचा सांगाडा बनवायचा असेल तर एक विशिष्ट प्रक्रीया आहे त्यासाठी वेगळीच यंत्र  सामग्री लागते. सुरवातीला मला देखील त्यात काय अवघड आहे असे वाटले म्हणून मी एका अनुभवी व प्रथितयश उद्योगपतींना या विषया संदर्भात भेटलो. त्यांना विचारले, "सर आपण चंद्रयान, मंगळयान बनवतो मग द्विचक्री बनवणे काय अवघड आहे?" त्यावर ते म्हणाले, "होय बरोबर आहे पण मंगळयान बनवून आपण ते बाजारात विकत नाही." जर १००% भारतीय द्विचक्री बनवयची असेल तर ती व्यवहार्य असली पाहिजे उत्पादन, दर्जा आणि मागणी यांचा मेळ जमला पहीजे तरच ते अंतरराष्ट्रीय पातळीवर टिकू शकेल आणि पर्यायाने भारतीय लोक त्याला पसंती दाखवतील. शेवटी प्रश्न पैशांचा आहे लोक विचार करणारच म्हणूनच तर चिनी बनावटीच्या वस्तू लोक खरेदी करताना दिसतात आणि हेच कारण आहे आपल्या कडे उत्पादन नसल्याचे. जागतिक स्तरावर आधुनिक द्विचक्री चा वापर भारतात नगण्य आहे तो जसजसा वाढेल तसतसे आपली मागणी वाढेल त्यासाठी आपल्या देशात द्विचक्री चा वापर वाढला पाहिजे. मी त्यासाठी अनेक उद्योग पतींना भेटलो पण १००% भारतीय द्विचक्री चा प्रस्ताव व्यवहारी गणितापुढे हरला. भारतीय माणूस दळणवळणा साठी द्विचक्री चा वापर करेल यावर त्यांचा विश्वास बसत नसेल कदाचित पण यावर माझे वैयक्तीक मत वेगळे आणि महत्वाकांक्षी आहे. भारत आधुनिक रूप्याचे मिश्रण असणाऱ्या धातूच्या द्विचक्री उत्पादनात चीन ला मागे टाकू शकतो. आज जगात कोणत्याही देशातील लोकांना चिनी उत्पादने नको आहेत. ही एक सुवर्ण संधी आहे पण भारतीय उत्पादक जुन्याच उत्पादन पद्धतीने बाजारात जुन्या प्रकारच्या द्विचक्री पुरवठा करण्यात धन्यता मानतात. विपणन कौशल्य आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जा पाळून केले जात असलेले उत्पादन याचा आभाव नसताना देखील केवळ जे आहे त्यात बदल न करण्याचा आणि ग्राहकांना तेच ते जुने विकण्याचा स्वभाव या गोष्टीं मुळे आपण या क्षेत्रातील संधीचा फायदा घेऊ शकत नाही. द्विचक्री उद्योग हा अनेक सुटे भाग एकत्र करून केला जातो त्यामुळे त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. पंजाब या राज्यात पुर्वापार चालत आलेल्या अशा अनेक छोट्या मोठ्या ऊदयोगांची प्रचलीत श्रृंखला आहे पण ते ऊदयोग देखील आधुनिकीकरणासाठी प्रतिकूल आहेत असे जाणवते आणि काही तर काळाच्या पडद्याआड देखील जात आहेत. 

झटपट पैसे कमवून देणार्या व्यवसायां मुळे सहाजिकच मोठ्या प्रमाणात नविन उद्योगात येणारी गुंतवणूक गेल्या काही वर्षांत तिकडे वळवली गेली. आज पैसा टाकला की एका वर्षात दुप्पट, चौपट अशी काहीशी परिस्थिती होती त्यामुळे उद्योजक मागे पडले व गुंतवणूकदारांना देखील झटपट परतावा देणाऱ्या व्यवसायात जास्त रूची निर्माण झाली. गुणवत्ता, कल्पकता, नाविन्यपूर्ण संकल्पना, वाट बघणे उद्योग मोठा करणे या गोष्टी दुय्यम झाल्या. परंतु आता कर्मधर्म संयोगाने ते व्यवसाय तितकेसे आकर्षक राहीलेले नाहीत किंबहुना त्यात जोखिम वाढत चालली असल्याने नविन पिढी पुन्हा ऊदयोजकते कडे वळू लागेल असे दिसते. पुर्वी साधारण ९० च्या दशकात कुठल्या क्षेत्रात पुढे संधी आहेत हा विचार मोठ्या प्रमाणात केला जायचा तेंव्हा माहीती तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रात इतक्या झपाट्याने तेजी येईल हे कुणीही सांगितले असते तर विश्वास बसला नसता तशीच काहीशी परिस्थिती आज द्विचक्री ऊदयोगाची आहे. या साठी मोठी गुंतवणूक गरजेची आहे. केवळ द्विचक्री बनवणे आणि विकणे ईतकीच सीमित दृष्टी नसून ती एक छोटीशी सुरवात आहे. चारशे हून अधिक कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात सहज होवू शकते. ज्याची व्याप्ती जागतीक आहे आणि अनादी काळा पर्यंत चालणारा हा फळांनी लगडलेला ऊदयोग भारतात सुरू होवू शकतो.

Comments