'कोव्हीड १९' लॉक डाउन मधून बाहेर पडण्यासाठी!

वाहनांच्या अपघातांची आणि इतर आजारांमुळे होणारे मृत्यू यांची "कोव्हीड-१९" बरोबर तुलना करायची झाली तर ते मृत्यू अपघाताने येत आहेत सहभागाने नाहीत. अपघात आणि सहभाग यात खूप तफावत आहे. त्या मुळे "करोना बरोबर जगणे" हे प्रत्येकाला कितपत शक्य आहे हा एक प्रश्न आहे. जीव मुठीत घेऊन आपण काय काय कामे करू शकणार आहोत? घरातल्या कर्त्या माणसांना दिवसभर बाहेर कमला गेल्या नंतर कुटुंबातील इतर व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे? शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य किती सुरक्षित असणार आहे? 

'कोव्हीड १९' लॉक डाउन मधून बाहेर पडण्या साठी आपल्या कडे पर्याय उपलब्ध आहे!

अशा परिस्थितीतीत भारताशी अनुकूल अशी उपाय योजना होणे गरजेचे आहे. डब्लू. एच. ओ. चे नियम इथे परिणामकारक असणार नाहीत. उदा. रस्त्यात थुंकणे ही सवय मोडण्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाही.  शिक्षण, शिस्तीचा आभाव, लोकसंख्या व गरिबी या गोष्टीं मुळे दोन व्यक्तीतील अंतर नियंत्रित ठेवणे अशक्य आहे. अशा वेळी सद्य परिस्थितीत शहरातील विलगीत क्षेत्रात विषाणूचा प्रादुर्भाव कमी करणे अशक्य आहे. 

या विषाणूच्या प्रसाराचा सर्वात महत्वाचा आणि दुर्लक्षित मुद्दा हा आहे कि हा विषाणू स्पर्शाने तर पसरतोच पण वस्तूंच्या पृष्ठभागावरून देखील पसरतो आणि हेच भारताच्या बाबतीत सगळ्यात घातक कारण आहे. जरी शहराचा काही भाग विलगीत केला तरी त्या परिसरातल्या सुविधा या सार्वजनिक आहेत व त्या परिसरात वस्तू आणि सुविधा यांच्या पृष्ठभागावर असणाऱ्या विषाणू चे निर्जंतुकीकरण करायचे ठरवले तर कितीही प्रशासन कामाला लागले तर ते पुरे पडणार नाही. वस्तूंची होणारी देवाण घेवाण, चलनी नोटा, कागद पत्रे, काय काय निर्जंतुकीकरण करणार आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवणार? 

अशा वेळी भारताच्या जनजीवनास सुगोग्य उपाय सुचवावासा वाटतो आहे आणि तो म्हणजे 'विलगीत गांव' (Quarantown) - शहरापासून लांब अशी संपूर्ण पणे प्रतिबंधीत जागा, जेथे या संक्रमित झालेल्या, त्यांच्या व संपर्गात आलेल्या आणि त्यांच्या वर उपचार करणाऱ्या लोकांचे एक वेगळे गांव वसवावे लागेल ज्या ठिकाणी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. जिथे शहरातील सर्व रुग्ण हलवावे लागतील जेणे करून ते रुग्ण वस्तू आणि सुविधांच्या पृष्ठभागावर 'कोव्हीड १९' चे विषाणू पसरावणार नाहीत आणि त्या रुग्णांचा इतर लोकसंख्येशी काहीही कारणाने संबंध येणार नाही. तिथे फक्त जाणारी पुरवठा वाहतूक असेल  आणि संपूर्ण बरे झालेले रुग्णाचं तिथून बाहेर पडू शकतील. हा एकमेव उपाय सध्यातरी समोर दिसतो आहे. अवघड असला तरी अशक्य नाही. वैद्यकीय सेवेसाठी हे मोठे आव्हान आहे पण शहरातील आव्हानां पेक्षा कदाचित कमी त्रासदायक आणि जास्त सुरक्षित असू शकेल. सर्व पुरवठा देखील एकाच ठिकाणी करावयाचा असल्याने व्यवस्थापन देखील सोपे असू शकेल. पुढे जसे जसे रुग्ण सापडतील तसे ते या केंद्रा वर पाठवता येतील. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे शहरे व छोटी मोठी गावे पुन्हा पूर्वी सारखी सुरु करता येतील. ते ही लवकरात लवकर. अन्यथा कायम लॉक डाऊन ठेवणे अर्थ चक्रासाठी आणि जनजीवन सुरळीत करण्या साठी अशक्य आहे. या विलगीत गावांच्या उपलब्धते मुळेे शहरातील खात्री केलेल्या रुग्णांची संख्या रोज 'शून्य' करता येईल आणि त्यांच्या संपर्कात आलेले लोक ओळखणे देखील सोपे जाईल व जागा देखील काही कालावधी करता रिकाम्या किंवा प्रतिबंधित करता येतील. रुग्ण बरे होऊन जात असल्याने 'विलगीत गावाची लोकसंख्या देखील नियंत्रणात राहील. आता इतकी लोकं ठेवायची कुठे यावर प्रशासनाला उत्तर शोधावे लागेल व त्या जागा देखील राहण्या लायक असाव्यात म्हणजे लोक तिथून बरे होऊन घरी जातील पळून जाणार नाहीत. या करता सध्या पुरता रिकाम्या असलेल्या पर्यटन स्थळांचा विचार केला जाऊ शकतो. पावसाळ्यात देखील तिथे एरवी ऑफ सीजन असतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात रुग्णांना मानसिक आधार मिळेल.  

सध्या आपल्या पुढे "करोना सोबत जगणे" हा भीषण पर्याय आहे आज अमेरिकेत काय अवस्था आहे ते आपण बघतो आहोत, ती लोकं मास्क, ग्लोव्हस आणि सानिटायझर वापरात नसतील का? लस उपलब्ध नाही, कधी होईल माहित नाही व सामाजिक रोग प्रतिकार शक्ती (हॅर्ड इम्युनिटी) हा भारताची लोकसंख्या बघताना खूप लांबचा पल्ला आहे तो पर्यंत खूप उशीर झाला असेल. एका पेल्यात साखर टाकून तो पेला संतृप्त करणे आणि एखादा हौद संतृप्त करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. करोना व्हायरसची तुलना टीबी, डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया बरोबर करून चालणार नाही. वरील सर्व आजारांवर लस व उपचार आहेत त्याच प्रमाणे त्यांच्या प्रसाराचा वेग 'कोव्हीड १९' पेक्षा खूप कमी आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम नगण्य आहे.

करोना बरा होण्याचे प्रमाण खूप असले तरी त्याची लागण आणि त्याच्या प्रासराच्या वेगा मुळे जागतिक महासत्ता गुडघे टेकत आहेत. फक्त १-२ टक्के लोकांचा मृत्यू होतो त्या मुळे करोनाला घाबरायचे कारण नाही हा युक्तिवाद कितपत योग्य आहेे? इतर आजारां मुळे डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलिस यांचे जीव ईतक्या मोठ्या प्रमाणात घेतलेले नाहीत. रुग्णालयाची बिलं आणि डॉक्टरांवरील असणारा भार न पेलवणारा आहे. उपचार अगदी मोफत केले तरी त्याचा भार आपल्याच सरकार वर पडणार आहे व प्रक्षिशित मानव संसाधनांना मुकावे लागणार आहे.

अशा डेड एन्ड सदृश्य परिस्थितीत 'विलगीतगांव' (Quarantown) जरी परी कथेतल्या कल्पने प्रमाणे वाटत असले तरी ते रामसे ब्रदर्स च्या सिनेमा पेक्षा उत्तम पर्याय आहे. कोव्हीड १९ हे जरी वरकरणी वैद्यकीय आव्हान वाटत असले तरी ते व्यव्थापकीय आव्हान आहे आणि त्यावर व्यवस्थापकीय उत्तरे आहेत. 

इतिहासाचा दाखला द्यायचा झाला तर आपण या महाकाय शत्रूला महाराजांच्या 'गनिमी काव्याने' आपण हरवू शकतो. महाराजांनी अफजल खान आणि सैन्य जावळीत नेऊन मारले होते. बलाढ्य शत्रूला हरवण्याची तर आपली परंपराच आहे. 

बाकी कुणाला शक्य होईल नाही ते माहीत नाही पण महाराष्ट्र नक्कीच करून दाखवेल. 

आनंद वांजपे,

पुणे 

९८९०९९८६४४

© Anand Vanjape, Pune anandvanjape@gmail.com

Comments